spot_img
spot_img
spot_img
spot_img

IPL नंतर वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळी! चौकार | षटकारांचा पाडला पाऊस

IPL 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. १३ वर्षीय वैभववर राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावली. पहिल्याच हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. या हंगामात त्याने वेगवान शतक झळकावलं. आयपीएल स्पर्धेत राडा घातल्यानंतर आता त्याने इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.
या महिन्याच्या शेवटी भारतीय १९ वर्षांखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ५ वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना २७जूनला खेळला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसेल.

spot_img

Related Articles

बंगळुरुच्या चेंगराचेंगरीत 21 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, पित्याचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले

बंगळुरुच्या चेंगराचेंगरीत 20 वर्षाच्या भौमिक लक्ष्मणचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी त्याचे वडील...

पंतप्रधान ग्रामसडक रस्ता दर्जेदार होण्यासाठी सरपंच मयूर आंधळे आक्रमक

सोन्नाखोटा ते खडकी रस्ता प्रलंबित, बस वाहतूक ठप्प, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान..! वडवणी प्रतिनिधी :- मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सोन्नाखोटा ते खडकी रस्त्यास मंजुरी मिळाली असून त्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!